हिंदजागर प्रतिनिधी – आज पहाटे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. एक खासगी बस दरीत कोसळली असून यात १३ जणांचा मृत्यू झाले असून २० ते २५ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे…बसमध्ये एकूण ४० ते ४५ जण प्रवास करत असल्याचे समजते. मुंबईच्या गोरेगाव येथील बाजीप्रभू वादक गट (झांज पथक) हे पुणे येथे एक कार्यक्रम करण्यासाठी गेले होते. पुण्याहून परतताना त्यांच्या बसला जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर अपघात झाला.
शिंगरोबा मंदिराच्या अलिकडील घाटात ही बस बाजूच्या दरीत कोसळली. बसमधील २७ जणांना वाचवण्यात आले आहे. बचावकार्यात खोपोलीतील पथक, खंडाळ्यातील पथक, स्थानिक पोलीस, महामार्ग पोलीस यांनी महत्त्वाची मदत उपलब्ध करून दिली.
- श्री.विनोद वाघमारे ( स्थानिक प्रतिनिधी )