हिंदजागर विशेष – विश्वरत्न डॉ. बाबा साहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.शंकर मड्डीमणी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव समितीने अनोख्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली . सकाळी जेष्ठ नागरिकांसाठी व लहान मुलांसाठी नाष्टा वाटपाचा कार्यक्रम तसेच दुपारच्या वेळेमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर जयंती उत्सव समिती मार्फत राबवले गेले .
जनवाडी जनता वसाहत भागातील लहान 1000 व गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम सुद्धा सालाबादप्रमाणे करण्यात आला. परिसरातील अनेक राजकीय,सामाजिक, शासकीय व्यक्तींनी या सामाजिक उपक्रमाला उपस्थिती नोंदवली त्यावेळी श्री काशिनाथभाऊ रुपटक्के ( दिनराज मित्र मंडळ,अध्यक्ष ), श्री.विनायकभाऊ चव्हाण ( सामाजिक कार्यकर्ते ),श्री.अंबादास पंडित,श्री.मारुती दौडमणी,श्री.बाळकृष्ण तोबिकर,श्री.शुभम जाधव,श्री.सिद्धार्थ कुऱ्हाडे,श्री.शुभम चंदनशिवे, श्री.मनोज दौडमणी आदी लोक कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होते.
- श्री. गणेश मारुती जोशी ( प्रतिनिधी )