हिंदजागर न्यूज – दोन गटांमध्ये वाद झाल्यानंतर लष्कर पोलिस ठाण्यात गोंधळ घातल्या प्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक विवेक यादव याच्यासह 8 ते 10 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, लष्कर पोलिसांनी ति
घांना ताब्यात घेतले आहे. विवेक यादव (40, रा. वानवडी), त्याचा भाऊ संतोष यादव (25, रा. लुल्लानगर), सागर वैर्या (20), पंकज जगताप (35, रा. कुंभारबावडी, लष्कर), सुशिल यादव (35), शिवाजी उर्फ छत्या याच्यासह 8 ते 10 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अमित नारायण मोरे (28, रा. लष्कर) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास लष्कर परिसरात घडली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने लष्कर परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. त्यामध्ये फिर्यादी अमित मोरे सहभागी झाले होते. मिरवणूक बाटा चौकात आल्यानंतर मोरे यांच्या ओळखीतील संतोष यादव, सागर वैर्या आणि त्यांच्या इतर साथीदारांनी त्यांना धक्का दिला तसेच मोरे यांच्यासोबत असलेल्याला मारहाण केली.मोरे हे त्याबाबतची तक्रार देण्यासाठी लष्कर पोलिस ठाण्यात गेले.माजी नगरसेवक विवेक यादव देखील साथीदारांसह लष्कर पोलिस ठाण्यात गेला.यादवने कमरेला लावलेले पिस्तुल रोखुन पोलिसांकडील तक्रार मागे न घेतल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.दरम्यान, मोक्काच्या गुन्हयातून जामीनावर बाहेर असलेल्या विवेक यादव याच्याविरूध्द सरकारी कामातअडथळा आणल्याप्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, लष्कर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतल जाधव अधिक तपास करीत आहेत.
- श्री.गणेश मारुती जोशी ( प्रतिनिधी )