हिंदूजागर प्रतिनिधी – पिंपरी चिंचवडमधील किवळे, देहूरोड परिसरात सोमवारी सायंकाळी होर्डिंग कोसळून पाच जणांना आपला जीव गमवावा लागला, तर तीन जण जखमी झाले. जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक नागरिकांना होर्डिंगखाली आसरा घ्यावा लागला.जोरदार वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळले आणि त्याखाली आसरा घेतलेले काही लोक अडकले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
सध्या बचावकार्य सुरू असून, ढिगारा हटवण्यासाठी आणि जखमींना रुग्णालयात हलवण्यासाठी सहा क्रेनचा वापर करण्यात येत आहे. बचाव पथकाने एकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले आहे.या घटनेमुळे घटनास्थळी मोठी गर्दी उसळली असून स्थानिक लोकही मदतकार्य करत आहेत.अधिकाऱ्यांनी नागरिकांना अशा हवामानाच्या परिस्थितीत सावध राहण्याचा सल्ला दिला आहे आणि होर्डिंग्ज किंवा इतर कोणत्याही तात्पुरत्या इमारतींखाली आसरा घेणे टाळावे.
- श्री. गणेश मारुती जोशी
- ( प्रतिनिधी )