हिंदजागर प्रतिनिधी – सोमवार दिनांक २४/०४/२०२३ रोजी सायं ४.००वाजता *भावी खासदार प्रशांतदादा जगताप* यांच्या वाढदिवसानिमित्त *दुचाकीस्वारांना रुपये ५.८६ /- कमी दराने पेट्रोल वाटप* कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी शहर अध्यक्ष किशोर कांबळे, माजी स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके,राजू साने, संदीप बालवडकर,बाळासाहेब आहेर, व्ही. जे. एन. टी. शहर अध्यक्ष गोविंद पवार,विशाल मोरे,विध्यार्थी अध्यक्ष विक्रम जाधव,शुभम मताळे,महेश हांडे,लावण्या शिंदे,मतदार संघ कार्याध्यक्ष केतन ओरसे, निलेश रुपटक्के खडकीब्लॉक युवक अध्यक्ष सागर हुले विध्यार्थी अध्यक्ष कार्तिक थोटे व सर्व युवक पदाधिकारी छत्रपती शिवाजीनगर पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचा लाभ सुमारे 550 ते 600 लोकांनी घेतला.कार्यक्रमाचे पूर्ण आयोजन ऍड स्वप्निल जोशी यांनी केले होते.यावेळी प्रशांत जगताप खासदार होण्याआधी त्यांचा साधा कार्यकर्ता स्वप्निल हा दोन तासासाठी ५ रुपये कमी दराने पेट्रोल स्वखर्चातुन देतो तर मा. अजितदादा मुख्यमंत्री आणि प्रशांतदादा खासदार झाले तर नक्कीच पुण्याचा विकास होईल असे मनोगत किशोर कांबळे यांनी व्यक्त केले.