हिंदजागर न्यूज – गुन्हा व गुन्हेगारांचा छडा लावण्यासाठी त्या ठिकाणांवरील उपलब्ध माहिती व साधनांचा पोलिस खात्याला आधार घ्यावा लागतो.यातच प्रत्यक्ष न पाहिलेल्या व्यक्तींचा दुस-यांनी सांगितलेल्या माहितीच्या आधारे त्याचे संभाव्य व अचूक रेखाचित्र तयार करणे ही अवघड कला दापोडीतील रहिवासी पोलिस खुशाल वाळुंजकर यांनी आत्मसात केली आहे.त्यांच्या रेखाचित्रांमुळे अनेक गुन्हे व गुन्हेगारांचा पोलिस खात्याने छडा लावला आहे. सामान्य कुटुंबातील संघर्षमय प्रवास करत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी एक खेळाडू ते पोलिस भरती असा प्रवास करत गुन्हे विभाग अंतर्गत घेण्यात आलेल्या छायाचित्रे प्रशिक्षण वर्गात प्रथम क्रमांक मिळवत देशातील व महाराष्ट्रातील एकमेव पोलिस असल्याचा मान मिळवला आहे. या कामगिरीमुळे महाराष्ट्र पोलीस महासंचालक वतीने राज्यातील गृहखात्याची विशेष कामगिरी करणा-या पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदक जाहीर करण्यात आले.या सन्मानामुळे पिंपरी चिंचवड व दापोडी करांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
रेखाचित्रकारांच्या अद्भुत केलेमुळे आरोपींचा माग काढणं सोपं होत.
खुशाल वाळुंजकर यांच्या कामगिरीमुळे पोलीस दलाला रेखाचित्रकारामुळे पंचविसहून अधिक गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेले आहे. पोलीस दलातील चौदा वर्षांच्या कार्यसेवेत विविध सेवा बजावताना कोरोनोच्या काळातील कामाचा ताण कमी असल्यामुळे पाच ते सहा महिन्यांच्या काळात जमलेल्या रेखाटन कलेमुळे वाळुंजकर यांनी पोलिस दलात वेगळी प्रतिमा तयार केली आहे.महाराष्ट्रच नाहीतर भारतात प्रथम पोलीस रेखाचित्रकार होण्याचा बहुमान त्यांनी मिळवला आहे.याआधी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाकडून बाहेरच्या स्केच आर्टिस्टला बोलवून त्यांना फी देऊन स्केच काढून घेतले जायचे पण आता पोलीसच स्केच काढत असल्याने शासनाचा पैसाही वाचतो आहे. माझ्याप्रमाणे ज्यांना रेखाचित्र काढण्याचे आवड असेल त्यांनी आपल्या कलेचा वापर करून महाराष्ट्र पोलीस दलासाठी सेवा करावी असं ते सांगतात.स्वातंत्र्य सेनानी कुटुंबातील खुशाल वाळुंजकर यांचे आजोबा कै.नानासाहेब वाळुंजकर यांच्या संस्कारात वाढल्याने निस्वार्थ देशसेवेच्या शिकवणीचे बाळकडू मिळाले.आजोबांनी स्वातंत्र्य सेनानी पेन्शन ही नाकारली त्यांचा आदर्श घेवून पुढे वाटचाल करत समाज व देशासाठी त्यांचे कार्य सुरू आहे.फिर्यादीकडे स्वतः जावून ते माहिती व वर्णन घेतात.
कोरोना काळाचा संधी म्हणून वापर-
कोरोनाच्या काळात अतिक्रमण विभागातील पोलिसावर कामाचा ताण तुलनेने कमी होता. त्यामुळे या संधीचा फायदा घेत वाळुंजकर यांनी सर्वप्रथम स्वतःचं आणि त्यानंतर एक एक करत शेकडो रेखाचित्रे रेखाटण्यास सुरुवात केली यातून त्यांचा वेळ जात होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाळुंजकर यांच्या वडिलांचे निधन झालं आणि ते पुरते खचून गेले.वडिलांच्या निधनामुळे आलेल्या मानसिक तणावातून वाळुंजकर यांना बाहेर येण्यास बराच कालावधी लागला त्या काळात त्यांना रेखा चित्राने साथ दिली दरम्यान राज्य गुन्हे अन्वेषण विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या परीक्षण वर्गात वाळुंजकर यांची निवड करण्यात आली रेखा चित्रांची दुसरी बॅच असल्याने राज्यभरातील पोलिसांमध्ये यात याबाबत विशेष अप्रूप होते वाळुंजकर यांनी अनेक अडचणीवर मात करून राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला.
- श्री.विनोद वाघमारे ( प्रतिनिधी )