हिंदजागर प्रतिनिधी – मा.श्री.विजय मधुकर दास्ताने, रुपक ताल विद्यालय, बिबवेवाडी, पुणे-३७ यांचेवतीने श्री.शाम वि. जोशी, पं.जी.एल.सामंत, पं.जी.एन.पर्वतकर यांचे स्मृती प्रित्यर्थ “गुरुवंदना” या कार्याक्रमाचे आयोजन दि.३०/०४/२०२३ रोजी,पार्क लँड सोसायटी,बिबवेवाडी,पुणे येथे करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात प्रथम सत्रात ओंकार जोशी, अथर्व कदम, अथर्व जगदाळे, यांनी उत्तम तबला वादन करून उपस्थित प्रेक्षकांची वाह वाह मिळवली. शंतनू दिघे यांनी संवादिनी साथ दिली. कार्यक्रमाच्या दुस-या सत्रात तबला – अर्थव कदम, ढोलकी – ओंकार जोशी, कहोन – अर्थव जगदाळे, झेंबे – आर्य कल्याणकर, तालवाद्य – रितेश बुरुड, संवादिनी साथ – शंतनू दिघे यांनी वादन करून कार्यक्रमात सुंदर रंगत आणली. सूत्रसंचालन मुकुल शिंगाडे यांनी केले. सदर कार्यक्रमात डॉ.राजेंद्र दूरकर यांनी उपस्थित राहून तालवाद्य वादना बाबत मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. गुरुवर्य श्री.विजय दास्ताने सर यांनी घडविलेल्या वादक शिष्यांचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा रुपी आशीर्वाद दिले. व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन नियोजन उत्तम रित्या केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी पुणे जिल्ह्यातील दिव्यांग शाळेतील पुणे टिचर युनिटी ग्रुपचे सदस्य, पुण्यातील अनेक तबला प्रेमी नागरिक, विद्यार्थी यांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.