हिंदजागर प्रतिनिधी – महाराष्ट्रमुंबई पुणेदेश विदेशमनोरंजनक्रीडा- IPL 2023लाईफस्टाईलवेब स्टोरीजमहात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधींचे निधन; वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वासआम्ही मागून वार करीत नाही, आमची भूमिका स्पष्ट : रामदास आठवलेतिहार जेलमध्ये गॅंगवॉर; कुप्रसिद्ध गँगस्टर टिल्लूची हत्या, लोखंडी रॉडने केला हल्लामहात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधींचे निधन; वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वासआम्ही मागून वार करीत नाही, आमची भूमिका स्पष्ट : रामदास आठवलेतिहार जेलमध्ये गॅंगवॉर; कुप्रसिद्ध गँगस्टर टिल्लूची हत्या, लोखंडी रॉडने केला हल्लादेश विदेशEXPLAINER: शरद पवारांच्या राजीनाम्याचा महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणावर काय परिणाम होणार?Sharad Pawar resigns as NCP chief: राष्ट्रीय राजकारणात शरद पवार यांचा दर्जा भीष्म पितामहांचा आहे. ते देशाचे कृषिमंत्री आणि संरक्षण मंत्रीच राहिलेले आहेत. शिवाय देशाच्या राजकारणावर त्यांची पकड आणि विरोधी नेत्यांमध्ये त्यांची मान्यता सर्वांना परिचित आहे.Karnataka Election NewsKarnataka Election NewsSaam TVChandrakant JagtapChandrakant JagtapPublished on : 2 May, 2023, 8:32 pmUpdated on : 2 May, 2023, 8:32 pmSharad Pawar resignation Effect on Maharashtra And National Politics : महाराष्ट्राचं राजकारण सध्या प्रचंड अनिश्चिततांनी भरलेलं आहे. राज्यातलं राजकारण सध्या ज्या वळणावर आहे, तेथून पुढे काय होऊ शकतं हा अंदाज वर्तवणं भल्या भल्या राजकीय तज्ज्ञांच्या आवाक्यातली बाब राहिलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकिय नेत्यांकडून राज्यात भूकंप होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यानंतर राज्यात सत्तापालट होणार अशी चर्चा रंगली होती. या चर्चेत राष्ट्रवादीची भूमिका महत्त्वाची मानली जात होती. परंतु तेव्हा असा एखादा भूकंप होईल असं कोणाच्या डोक्यातही आलं नसेल.सुमारे दोन आठवड्यांपूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी १५ दिवसांत राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आज शरद पवारांनी अचानक पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पवारांच्या या राजीनाम्याचा परिणाम केवळ राष्ट्रवादी पक्षापुरताच मर्यादित नसेल तर त्याचा दुरगामी परिणाम राज्याच्या आणि देशाच्या राजकारणावर देखील होऊ शकतो हे राजकारणाची जाण असलेला कोणताही सामान्य माणूस आत्मविश्वासाने सांगू शखतो.मुंबईतील वाय बी सेंटरमध्ये आज शरद पवारांचं आत्मचरित्र असलेल्या ‘लोक माझे सांगती’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा होता. या सोहळ्यात शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. पवारांच्या या घोषणेने या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. शरद पवार यांनी राज्यसभा खासदार म्हणून उर्वरित तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचेही स्पष्ट केले.शरद पवारांनी हा निर्णय अचानक घेतला की गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मनात हा विचार सुरू होता, ही गोष्ट हळूहळू समोर येईल. शरद पवारांच्या या राजीनाम्याचा देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल? आणि भाजपवर या निर्णयाचा काय परिणाम होईल असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे.
राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होणार ?
महाराष्ट्राच्या राजकारणात 2019 पूर्वी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येईल असे कोणालाही वाटले नसेल. पण शरद पवारांच्या पुढाकाराने ते घडलं आणि राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. त्यानंतरही हे तीन वेगवेगळ्या विचारांच्या पक्षांचं टिकेल का अशा सवाल अनेकांच्या मनात होता.परंतु महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनी ते जोडून ठेवले. सत्ता गेल्यानंतरही महाविकासआघाडी भक्कमपणे वज्रमुठ करून भाजपशी लढत आहे. पण आता पवार राष्ट्रवादीची धुरा दुसऱ्या कुणाच्या खांद्यावर सोपवणार असतील तर महाविकास आघाडीचं काय होणार आणि राष्ट्रवादीची पुढील वाटचाल नेमकी कशी असेल असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
महाविकास आघाडीचं काय होणार…?
ठाकरे गटाला राष्ट्रवादीशी जोडून ठेवणाऱ्या संजय राऊत हे आतापर्यंत शरद पवारांच्या सल्ल्याने चालत होते. आता ते अजित पवारांच्या मताला प्राधान्य देतील का किंवा अजित पवार महाविकासआघाडी भक्कम ठेवण्यासाठी काम करतील की दुसरा एखादा पर्याय निवडतील हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. दुसरीकडे काँग्रेसमधील अनेक नेत्यांचं महाविकास आघाडीत पक्षाचं अस्तित्वच नाहीसं होतं असल्याचं मत आहे. अशा परिस्थितीत महाविकासआघाडीला एकत्र ठेवणारा पवारांसारखा मुत्सद्दी नेता निर्णय प्रक्रियेतून बाजूला होत असेल तर महाविकासआघाडीचं काय होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पवारांच्या राजीनाम्याचा भाजपला फायदा…?
शरद पवार यांनी 2024 पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणे भाजपसाठी फायदेशीर मानले जात आहे. अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानतंतर शरद पवार निर्णय प्रक्रियेत कितपत सक्रिय राहतील हा मोठा प्रश्न आहे. शरद पवारांच्या सक्रिय राजकारणातून एक पाऊल मागे जाण्याने भाजपसाठी महाराष्ट्र जिंकणं सोपं होऊ शकतं. देशाच्या राजकारणात महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची आहे. कारण उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात भाजप आपली ताकद मजबूत करून लोकसभेचा किल्ला अभेद्य करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अशा परिस्थितीत शरद पवारांच्या राजानाम्यामुळे राज्यातील विरोधी पक्ष विस्कळीत होऊन त्याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता जास्त आहे.
- हिंद जागर प्रतिनिधी…..