पुणे प्रतिनिधी – पुण्यातील एका DRDO शास्त्रज्ञावर कर्तव्यावर असताना व्हॉट्सअॅप, व्हॉइस मेसेज आणि व्हिडिओ कॉल यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेला बेकायदेशीरपणे संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप आहे. या बेकायदेशीर कृतीमुळे संवेदनशील माहिती चुकीच्या हातात पडल्यास भारताच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे.विश्रांतवाडीतील आळंदी रोडवर असलेल्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) प्रीमियर सिस्टीम इंजिनीअरिंग प्रयोगशाळा, संशोधन आणि विकास आस्थापना (Engrs.), [R&DE(E)] चे संचालक पीएम कुरुलकर, असे अटक आरोपीचे नाव आहे. आज त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) महाराष्ट्राने अधिकृत गुप्तता कायदा 1923 अंतर्गत गुन्ह्यांसाठी मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथक पुणे युनिटचे प्रभारी निरीक्षक करत आहेत.अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, DRDO कडून तक्रार आली होती, त्यानंतर पाळत ठेवली गेली आणि त्याला अटक करण्यात आली. त्याला हनी ट्रॅप करण्यात आल्याचा संशय आहे.
- श्री.गणेश मारुती जोशी ( प्रतिनिधी )