पुणे प्रतिनिधी – पुण्यातून एक धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. पुण्यात एका तरुणीने छेडखानीला कंटाळून छेड काढणाऱ्या तरुणाच्या डोळ्यात मिरची पूड फेकली आहे. शुक्रवारी सांयकाळी ही घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पुणे विद्यापीठातील या तरुणीने छेड काढणाऱ्या तरुणाच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जयकर वाचनालयात हा प्रकार घडला आहे.
नेमकं काय घडलं ?
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थिनीची एक तरुण सतत छेड काढायचा. दोघेही एकाच विद्यापीठात शिकत होते. त्या विद्यार्थ्याच्या छेडखानीला तरुणी वैतागली होती.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जयकर वाचनालयात तरुणीला छेड काढणारा हा तरुण दिसला. त्यावेळी या तरुणीने हा सतत छेड काढत असल्याच्या कारणाने विद्यापीठात शिकणाऱ्या या तरुणाच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, या घटनेने विद्यापीठ आवारात खळबळ उडाली आहे.