पुणे प्रतिनिधी – जनसेवा विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्येत आता आणखी एक ट्विस्ट आला आहे. किशोर आवारे यांच्या हत्येमुळे माजी उपनगराध्यक्ष भानू खळदे याचा सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे हाच या प्रकरणाचा मास्टर माईंड तर नाही ना? असा संशय पोलिसाना आहे. सध्या भानू खळदे हा फरार असून पोलिस पथक यांच्या मागावर पाठवण्यात आली आहे.मावळ तालुक्यातील तळेगाव नगर परिषदेसमोर जनसेवा विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांचा निर्घृण खून करण्यात आला होता. त्यामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. १२ मे रोजी किशोर आवारे यांची हत्या झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी अगोदर ७ जणांना अटक केलेली आहे. त्यांना आजा न्यायालयाने २५ मे पर्यंत कोठडी सुनावली आहे.वडिलांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी भानू खळदे याचा मुलगा गौरव खळदेने ही हत्या घडून आणल्याचं समोर आलं आहे. मात्र, आता भानू खळदे यानेच हे सर्व घडवून आणलं असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात येत आहे. या घटनेत हत्या करणाऱ्यांमध्ये सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे मुख्य सूत्रधार भानू खळदे असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांकडून या प्रकरणाच्या मुकिशोर आवारे यांच्या हत्येनंतर त्यांचे कुटुंबाने रस्त्यावर उतरून त्यांच्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आंदोलन देखील केले होते. या घटनेमुळे मावळ तालुक्यात तणावाचे वातावरण असून पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.ळापर्यंत जाण्यासाठी प्रयत्न करत असून भानू खळदे याला पकडल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा होणार असल्याचे देखील बोलले जात आहे.