हिंदजागर प्रतिनिधी – मु.कुडाळ जि.सिंधुदुर्ग येथे वासुदेव समाज बांधव यांचा वर भिक्षुकी करताना अमानुस पने मारहाण करण्यात आली या घटनेची संपूर्ण माहीती व विडिओ किंल्प झाल्यानंतर या समाजातील अनेक लोकांनी आपापल्या परीने आपापल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आले .या समाजातील जालना जिल्ह्यातील श्री. पवन झुंगे यांनी जालना जिल्ह्यातील उप – जिल्हाधिकारी यांना आंदोलनात बाबतचे निवेदन दिले.
या अगोदर सुद्धा अनेक वेळा समाज बांधवांना वरती वेगवेगळ्या प्रकारचे अमानुष मारहाण तसेच महिलांवर ती मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले आहेत शासनाला वेळोवेळी सांगून सुद्धा शासन / सरकार यावरती जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे . आजपर्यंत अनेक वेळा नुसत्या तक्रारी घेऊन अपेक्षित अशी कारवाई न करता हलेखोरांवर किरकोळ स्वरूपाची कारवाई करून सोडून दिले जाते .मागील २ वर्षापासून श्री.निलेशभाऊ प्रकाश निकम ( अध्यक्ष, महाराष्ट्र जोशी समाज संघटना,महाराष्ट्र राज्य ) यांच्या यांच्यावतीने भटक्या विमुक्त्यांना ॲट्रॉसिटी सारख्या कायदा लागत लागू करून देण्यात यावा यासाठी पाठपुरावा करीत आहोत पण सरकारकडून मात्र याबाबतचा ठोस असे कुठले उत्तर मिळत नाही .सिंधुदुर्ग मध्ये घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे व त्याबाबत मी एक समाज समाज बांधव व महाराष्ट्र जोशी समाजाच्या वतीने याचा जाहीर निषेध करतो तसेच जर हे भिक्षुक लोक चुकली असतील तर त्यांना पोलिसांच्या हवाली करायला पाहिजे होती पण स्थानिक नागरिकांनी तसं न करता कायदा हातात घेऊन त्यांना अमानुष व जीवनिशी मारहाण केली तसेच त्यांना हे अधिकार कोणी दिले ?? आणि इतके होऊन सुद्धा पोलीस प्रशासन मात्र यावरती मूग गिळून आहे हे मात्र आश्चर्याची गोष्ट आहे .याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना तक्रार केली असून त्यांनी त्या तक्रारीची दखल घेऊन योग्य ती कारवाई करू असे नुसते आश्वासन दिले आहे.पण लवकरात लवकर जर कारवाई झाली नाही तर सदर गोष्टीला हिंसक वळण लागण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही हे बोलायला सुद्धा ते विसरले नाही. —- श्री.निलेशभाऊ प्रकाश निकम. ( अध्यक्ष, महाराष्ट्र जोशी समाज संघटना,महाराष्ट्र राज्य )