हिंदजागर न्यूज प्रतिनिधि – छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघ नखं ही लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममध्ये असल्याचा सरकारचा दावा आहे. तसेच ती वाघ नखं पुढील तीन वर्षांसाठी राज्य सरकार महाराष्ट्रात आणणार आहे. या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार रविवारी (१ ऑक्टोबर) ब्रिटनला रवाना होणार आहेत. यावरून आता आरोप-प्रत्यारोपाच्या सुरू झाल्या आहेत. कोल्हापूर येथील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी वाघ नखासंदर्भात अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच, सरकारनं शिवप्रेमींची दिशाभूल करू नये, असं मत व्यक्त केलं. या वादावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली..