हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – कधीकाळी सत्तेची सूत्र असलेला काँग्रेस पक्ष आता विरोधात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळे या पक्षाकडे विधान सभेचे उपाध्यक्षपद आले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले नाना पटोले राज्यभरात दौरे करत आहेत.आता काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्राची बैठक पुणे शहरात होत आहे. या बैठकीच्या आधीच पक्षातील गटबाजी समोर आली आहे. बैठकीसाठी राज्यभरातील नेते आले असताना ही गटबाजी समोर आली आहे.
या आमदारांचे बॅनर्सवर लावले फोटो पण आमदार रवींद्र धंगेकर यांचा मात्र फोटो गायब …
काँग्रेसच्या बैठकीच्या स्थळी पुणे ग्रामीणमधील दोन्ही आमदारांचे फोटो बॕनरवर लावले आहे. आमदार संग्राम थोपटे, संजय चंदूकाका जगताप यांचे फोटो बॅनर्सवर लावले आहे. मात्र पुणे जिल्ह्यातील तिसऱ्या आमदाराच फोटो बॅनर्सवर नाही. खरंतर काँग्रेसचे हे तिसरे आमदार पोटनिवडणुकीत विजय झाले आहे. भाजपकडून कसबा पेठेतील जागा त्यांनी हिसकवून घेत विजय मिळवला होता. या निवडणुकीची चर्चा राज्यभरात झाली होती. त्यानंतर या आमदाराचा फोटो बॅनरवर नाही.कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव करुन विजय झालेले आमदार रवींद्र धंगेकर यांचे फोटो या ठिकाणी नाही. बैठकीच्या ठिकाणावर असलेल्या बॅनर्सवरुन आमदार रवींद्र धंगेकर यांचा फोटो गायब आहे.धंगेकर पोटनिवडणुकीमुळे चर्चेत आले होते. WHO IS धंगेकर?, हा चंद्रकांत पाटील यांनी केलेला प्रश्न राज्यात चर्चेत आला होता. निवडणुकीत विजय मिळवून धंगेकर यांनी उत्तर दिले होते. परंतु त्यांनाच डावलले गेल्यामुळे काँग्रेसचे मतभेद उघड झाले आहे. बैठकीच्या आधीच ही चर्चा रंगली आहे.
=== गणेश मारुती जोशी ( स्थानिक प्रतिनिधी )