हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – फरार ड्रग्ज तस्कर ललित पाटील याचा उद्धव ठाकरे आणि दादा भुसे यांच्या सोबतचा फोटो समोर आलाय. काही वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दादा भुसे यांनी ललित पाटीलचा शिवसेने प्रवेश घडवून आणला होतं असं समजतंय.ललित पाटीलच्या शिवसेना प्रवेशावेळीचे हे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होतायत. या फोटोंमुळे राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.
ससून रुग्णालयातील ललित पाटील फरार झाल्यानंतर नाशिकमध्ये एका मागून एक ड्रग्जचे कारखाने समोर आले. पण, आता नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी तर या ड्रग्जप्रकरणात सरकारमधील आमदारांचा समावेश असल्याचा आरोप केल्याने खळबळ माजली आहे.नाशिक जिल्ह्यातील शिंदे-पळसे गाव आणि वडाळा सारख्या ग्रामीण भागात ड्रग्स तयार करणाऱ्या कारखान्यांचा भांडाफोड झाला. आधी मुंबई पोलीस आणि त्यानंतर नाशिक पोलिसांच्या छापेमारीत जवळपास 300 कोटीहून अधिक किंमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. या घटनांमुळे नाशिकची देवभूमीची ओळख आता ड्रग्जभूमी होवू लागल्याचं दिसून येतंय.. पण, आता नाशिकच्या या ड्रग्जप्रकरणात सत्ताधारी पक्षातील स्थानिक आमदाराचा सहभाग असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलाय, याचे पुरावेही आपल्याकडे असून येत्या विधिमंडळ अधिवेशनात ते सादर करणार असल्याचा इशाराच पटोलेंनी दिलाय.नाना पटोलेंचा थेटपणे नाशिकमधील सत्ताधाऱ्यांकडे इशारा आहे. पटोलेंच्या या आरोपांनंतर पालकमंत्री दादा भुसे समोर आले. पटोलेंकडे पुरावे असल्यास त्यांमी आमदारांची नावे उघड करावी असा प्रतिइशाराच दादा भुसेंना दिला.
=== गणेश मारुती जोशी ( स्थानिक प्रतिनिधी )