बसमध्ये चढताना पाय घसरला; मागून आलेल्या स्कूलबसखाली सापडून अभियांत्रिकी विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

1 Min Read

पुणे | प्रतिनिधी –  पुण्यातील माणिकबाग परिसरात बसमध्ये चढताना पाय घसरून रस्त्यावर पडलेल्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मागून येणाऱ्या स्कूलबसच्या चाकाखाली सापडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मृत विद्यार्थिनी मूळची राजस्थान येथील रहिवासी होती. ती पुण्यातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती.

संबंधित विद्यार्थिनी खानापूर–स्वारगेट मार्गावरील बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती. बसमध्ये मोठी गर्दी असल्याने चढताना अचानक तिचा पाय घसरला आणि ती रस्त्यावर पडली. त्याचवेळी मागून आलेल्या स्कूलबसच्या चाकाखाली ती सापडल्याने गंभीर जखमी झाली.

घटनेनंतर तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.या दुर्दैवी अपघातामुळे माणिकबाग परिसरात शोककळा पसरली आहे. अपघात नेमका कसा घडला, यासंदर्भातील अधिकृत माहिती आणि इतर तपशील पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहेत.

बातमीदार : श्री. गणेश मारुती जोशीहिंदजागर ऑनलाईन न्यूज डिजिटल पोर्टल

TAGGED:
Share This Article
Follow:
Welcome to Hindjagar News — हिंदजागर आणि आसपासच्या परिसरातील ताज्या बातम्या, अद्यतने आणि घडामोडींसाठी तुमचे विश्वसनीय माध्यम. आमचे ध्येय वाचकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या अचूक, वेळेवर आणि सहज समजण्याजोग्या बातम्या पुरवणे हे आहे. आम्ही स्थानिक कार्यक्रम, समुदायविषयक घडामोडी, शिक्षण, व्यवसाय, सरकारी कामकाज, सामाजिक मुद्दे, मनोरंजन, क्रीडा आणि इतर महत्त्वपूर्ण घडामोडींचे वार्तांकन करतो.
Leave a Comment