हिंदजागर ऑनलाईन न्यूज पोर्टल | पुणे – संचेती रुग्णालयासमोर पुणे महापालिकेकडून बसवण्यात येणाऱ्या चेंबर्सच्या कामावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहर उपाध्यक्ष श्री. सुहास (बापू) निम्हण यांनी आक्षेप घेतला आहे. चेंबर्स निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप केला आहे हिंदजागर ऑनलाईन न्यूज पोर्टललाही प्रतिक्रिया दिली.
नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा
या चेंबर्समुळे नागरिकांचा अपघात होऊन त्यांना दुखापत होण्याचा धोका आहे, अशी भीती निम्हण यांनी व्यक्त केली. रुग्णालयासमोर नागरिकांची ये-जा असताना तिथे बसवण्यात येणाऱ्या चेंबर्सची सुरक्षितता आणि कामाचा दर्जा तपासला आहे का, असा प्रश्न त्यांच्या आक्षेपातून उपस्थित झाला आहे.
चेंबर्सच्या दर्जाबाबत निम्हण यांनी केलेल्या आरोपाची स्वतंत्र पडताळणी अद्याप झालेली नाही. या कामाबाबत पुणे महापालिकेची अधिकृत प्रतिक्रिया उपलब्ध झाल्यावर ती प्रसिद्ध केली जाईल.
बातमीदार – श्री. गणेश मारुती जोशी,हिंदजागर ऑनलाईन न्यूज, पुणे



