बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा कृतीतून संदेश; मुकेश प्रतिष्ठानकडून तीन विद्यार्थिनींची शालेय फी भरली स्व. रामदास भिमाजी पवार व स्व. सुमन रामदास पवार यांचा शैक्षणिक वारसा जपत सलग १७१ व्या दिवशी माणुसकीचा उपक्रम..

2 Min Read

पुणे | प्रतिनिधी – एक हात माणुसकीचा व मानवतेचा हा विचार केवळ शब्दांपुरता मर्यादित न ठेवता तो प्रत्यक्ष कृतीत उतरवत मुकेश प्रतिष्ठानने शैक्षणिक दत्तक योजनेअंतर्गत तीन विद्यार्थिनींची शालेय फी भरून त्यांच्या शिक्षणाला मोलाचा आधार दिला.

स्व. रामदास भिमाजी पवार आणि स्व. सुमन रामदास पवार  यांनी मुला-मुलींच्या शिक्षणासाठी जपलेला शैक्षणिक वारसा पुढे नेत मुकेश प्रतिष्ठान सातत्याने गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कार्यरत आहे. या सामाजिक उपक्रमाचा हा १७१ वा दिवस होता.

मुकेश प्रतिष्ठानच्या कार्याला सातत्याने सढळ हाताने मदत करणाऱ्या लंडन येथील हितचिंतक सौ. पुनम अमित सातव व त्यांच्या कुटुंबीयांच्या विशेष सहकार्याने रयत शिक्षण संस्थेच्या हुतात्मा राजगुरू विद्यालय (न्यू इंग्लिश स्कूल), प्राथमिक विभाग, पांडवनगर, पुणे-१६ येथील तीन विद्यार्थिनींची शालेय फी भरण्यात आली.या शैक्षणिक मदतीचा लाभ कु. जैनबखातुन आजम अली (इयत्ता पहिली), कु. वैष्णवी राजेश वॉस्टर (इयत्ता तिसरी) आणि कु. सायली सनी पाटोळे (इयत्ता चौथी) या विद्यार्थिनींना मिळाला.

मुकेश प्रतिष्ठानचे मार्गदर्शक मा. सुरेंद्र देशमुख सर यांच्या हस्ते शालेय फी भरण्यात आली. या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या हुतात्मा राजगुरू विद्यालयातील गायकवाड मॅडम व शेळके मॅडम यांचे प्रतिष्ठानच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.यावेळी मुकेश प्रतिष्ठानच्या ज्योती देशपांडे मॅडम, सौरभ देशपांडे सर आणि ओम दादा देशमुख उपस्थित होते. मुकेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र सुमन रामदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अशा स्वरूपाचे उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत.

शिक्षण थांबू नये, स्वप्नांची वाट बंद होऊ नये!

आर्थिक परिस्थिती कोणत्याही विद्यार्थिनीच्या शिक्षणाच्या आड येऊ नये आणि प्रत्येक मुलीला शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळावी, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या विचाराला प्रत्यक्ष कृतीची जोड देत मुकेश प्रतिष्ठानने माणुसकी आणि शिक्षणाचा सुंदर संगम घडवून आणला आहे.

श्री. गणेश मारुती जोशी ( स्थानिक प्रतिनिधी )

Share This Article
Follow:
Welcome to Hindjagar News — हिंदजागर आणि आसपासच्या परिसरातील ताज्या बातम्या, अद्यतने आणि घडामोडींसाठी तुमचे विश्वसनीय माध्यम. आमचे ध्येय वाचकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या अचूक, वेळेवर आणि सहज समजण्याजोग्या बातम्या पुरवणे हे आहे. आम्ही स्थानिक कार्यक्रम, समुदायविषयक घडामोडी, शिक्षण, व्यवसाय, सरकारी कामकाज, सामाजिक मुद्दे, मनोरंजन, क्रीडा आणि इतर महत्त्वपूर्ण घडामोडींचे वार्तांकन करतो.
Leave a Comment