सुहास निम्हण आक्रमक; शाळा परिसरातील धोकादायक बसथांब्यांवर तातडीच्या कारवाईची मागणी..पावसामुळे बसथांबा कोसळल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; महापालिका आयुक्तांकडे मनसेची मागणी

1 Min Read

हिंदजागर ऑनलाईन न्यूज पोर्टल – पावसामुळे शाळेच्या परिसरातील बसथांबा कोसळल्याची घटना समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. या पार्श्वभूमीवर दररोज विद्यार्थी, पालक आणि नागरिक शाळांच्या परिसरातील बसथांब्यांचा वापर करतात. अशा ठिकाणी जीर्ण अथवा धोकादायक बसथांबा कोसळणे ही बाब नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर असल्याचे सुहास निम्हण यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.

दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी संभाव्य धोका आधीच ओळखून कारवाई व्हावी, अशी भूमिका घेत सुहास निम्हण यांनी शाळा परिसरासह शहरातील जीर्ण व धोकादायक बसथांब्यांची तातडीने पाहणी आणि स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

विशेषतः शाळा, महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असलेल्या परिसरातील धोकादायक बसथांबे तातडीने ओळखून त्यांची दुरुस्ती करावी किंवा आवश्यकतेनुसार नव्याने उभारणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

पावसाळ्यात अशा संरचनांची सुरक्षितता अधिक महत्त्वाची ठरत असल्याने प्रशासनाने केवळ एका घटनेपुरती कारवाई न करता शहरातील बसथांब्यांची व्यापक तपासणी करून संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी भूमिका मनसेकडून मांडण्यात आली आहे.

आता सुहास निम्हण यांनी उपस्थित केलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नाची महापालिका प्रशासन किती गांभीर्याने दखल घेते आणि धोकादायक बसथांब्यांवर काय कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

हिंदजागर ऑनलाईन न्यूज पोर्टल

 

TAGGED:
Share This Article
Follow:
Welcome to Hindjagar News — हिंदजागर आणि आसपासच्या परिसरातील ताज्या बातम्या, अद्यतने आणि घडामोडींसाठी तुमचे विश्वसनीय माध्यम. आमचे ध्येय वाचकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या अचूक, वेळेवर आणि सहज समजण्याजोग्या बातम्या पुरवणे हे आहे. आम्ही स्थानिक कार्यक्रम, समुदायविषयक घडामोडी, शिक्षण, व्यवसाय, सरकारी कामकाज, सामाजिक मुद्दे, मनोरंजन, क्रीडा आणि इतर महत्त्वपूर्ण घडामोडींचे वार्तांकन करतो.
Leave a Comment